शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी सोडलं दुश्मनीवर पाणी वॉटर कप स्पर्धेत भाग : दुरावलेल्या मित्रांकडून वाठार स्टेशन गावी पाणी फाउंडेशनचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:56 IST

वाठार स्टेशन (जि. सातारा) : पंचवीस वर्षांच्या राजकारणात एकमेकांपासून दुरावलेली मने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा जुळून आली.

संजय कदम।वाठार स्टेशन (जि. सातारा) : पंचवीस वर्षांच्या राजकारणात एकमेकांपासून दुरावलेली मने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा जुळून आली. ‘गावाला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊ,’ ही भूमिका घेऊन कोरेगाव तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या वाठार स्टेशनचे दोन दिग्गज विरोधक सात वर्षांनंतर पुन्हा एक झाले. ही सर्व किमया पाणी फाउंडेशनमुळेच शक्य झाल्याची भावना दोन्ही मित्रांनी व्यक्त केली.

शालेय जीवनापासून ते राजकारणापर्यंत शोले चित्रपटातील ‘जय-वीरू’सारखी मैत्री असलेले वाठार स्टेशनचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नागेश जाधव आणि ‘रिपाइं’चे जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवळे हे दोन मित्र सात वर्षांपूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून एकमेकांचे कट्टर विरोधक झाले. या काळात वाढलेल्या शत्रुत्वामुळे गावच्या विकासाला कुठंतरी खीळ घालत होती. हे दोन्ही चांगले मित्र पुन्हा एकत्र व्हावेत, यासाठी अनेकांनी प्रयत्नही केले होते. मात्र, या प्रयत्नांना यश मिळत नव्हते.

पाणी फाउंडेशनच्या तालुका समन्वयक मोनाली शेळके आणि राहुल भोसले यांनी दोन महिन्यांपूर्वी या दोघांनाही फोनवरून जलयुक्त शिवारबाबत माहिती दिली. यासाठी आपण प्रशिक्षण घ्या, असे आवाहनही केले. अनपटवाडीत प्रशिक्षण घेण्यासाठी दोन मित्रांनी एकत्रित हजेरी लावली. गावाला आलेला दुष्काळी कलंक आता पुसायचा, हा निर्धार मित्रांनी करत राजकारणातील वैमनस्य संपवून हातात हात घालून काम करण्याचा निर्णय केला.वाठार स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे नागेश जाधव आणि माजी पंचायत समिती सदस्य अंकुशराव जाधव हे दोन नेते एकत्रित काम करत आहेत.बस्स झालं बारमाही टँकरवाठार स्टेशन हे आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेले या भागातील प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच लोकांची गर्दी असते. त्यातच गावाची गरज भागेल एवढेही पाणी उपलब्ध नसल्याने कायमस्वरूपी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करावे लागते. त्यामुळे बारमाही टँकर असलेले गाव म्हणूनही गावची वेगळी ओळख आहे. ५ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या वॉटर कपमध्ये आता या गावानेही सहभाग घेऊन एक आदर्श प्रस्थापित करण्याचे काम केले आहे.